अखेर ठाण्यात लॉकडाऊन जाहीर | Lockdown in Thane | Covid 19 | Maharashtra News

2021-09-13 28

अखेर ठाण्यात लॉकडाऊन जाहीर झालंच... २ तारखेच्या सकाळी ७ पासून ते १२ तारखेच्या सकाली ७ पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. सोमवारपासून ठाण्यातली जनता दोन नेत्यांच्या विसंवादात भरडली जात होती. शहरात कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात संपूर्ण लॉकडाऊन घ्यायचा की नाही, यावरुन मागील दोन दिवस पालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यात गोंधळ सुरु होता. अखेर मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आध्यादेश काढत संपूर्ण ठाणो शहर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरात सध्या २० हजार ४७३ सक्रीय कोरोना बाधीत आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १४ हजार पेक्षा जास्त नागरिक कोरोनावरचा उपचार घेऊन घरी परत गेले आहेत तर एकट्या ठाणे शहरात ८७१ जणांचा बळी गेलाय. त्यामुळे शहरातील सर्व हॉटस्पॉटमध्ये कडक निबंर्ध घालण्यात आले आहेत.

#lokmat #covid19 #lockdown #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार

Videos similaires